कॅनडास्थीत डोंबिवलीकर डॉ. मैथिली भोसेकर पँरिस फँशन वीकमध्ये चमकली
By अनिकेत घमंडी | Published: October 7, 2023 01:05 PM2023-10-07T13:05:29+5:302023-10-07T13:06:08+5:30
कँनडास्थित डोंबिवलीकर मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट डॉ. मैथिली भोसेकर पॅरिस फॅशन वीक मध्ये चमकली
अनिकेत घमंडी
डोंबिवली: पॅरिस येथे २५ सप्टेंबर २०२३ ते ३ ऑक्टोबर २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅशन वीक मध्ये मूळची डोंबिवलीची असणारी डॉ. मैथिली भोसेकर हिने आपला ठसा चांगलाच उमटवला. डॉ. मैथिली हिने फ्लोरिडा इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजयी होऊन "मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३" हा किताब पटकावला आहे. तिची पॅरिस फॅशन वीक साठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती. उच्च फॅशनच्या जगात पॅरिस सारख्या नयनरम्य शहरात डॉ. मैथिली हिने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या प्रत्येक पावलांनी प्रेक्षकांना भुरळ घातली व ती आत्मविश्वासाने चालत राहिली.
त्यासंदर्भात येथील उद्योजक संदीप वैद्य यांनी माहिती देतांना सांगितले।की, हायटेक मोडा निर्मित कटुर या डिझायनर ब्रँड साठी मैथिली ने ले सलून डेस मिरिवर्स या ठिकाणी मॉडेल म्हणून कामगिरी बजावली आणि आपली चांगलीच छाप पाडली. मैथिली हि डेंटिस्ट असून मॉडेलिंग हि तिची आवड तिने मनापासून जोपासली आहे. फॅशन आणि सौंदर्याच्या जगात तिने स्वतःची अशी जागा निर्माण केली आहे. तिला या साठी डॉ. अक्षता प्रभू सीईओ "धी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट" यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परदेशात राहूनही डॉ. मैथिली हि भारतीय संस्कृती जपणारी बहुगुणसंपन्न व महत्वाकांक्षी मॉडेल म्हणून चमकत आहे.