मुल्हेर गडावरील तोफांना मिळाली नवसंजीवनी,सह्याद्री प्रतिष्ठानने दरीतील तोफा गडावर नेल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:24 PM2022-03-08T18:24:10+5:302022-03-08T18:24:46+5:30
Mulher Fort : नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या. त्या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्य़ांनी केले आहे.
कल्याण - स्वराज्याच्या लढाईत गडावरील तोफा गनिमांच्या विरोधात आग ओकायच्या. कालांतराने गड किल्ल्याचे पाहिजे तसे संवर्धन झाले नाही. नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या. त्या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्य़ांनी केले आहे.
नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावस असलेल्या मुल्हेर गड हा अतिमहत्वाचा होता. या गडावर शिवप्रसाद आणि रामप्रसाद या दोन तोफा होत्या. गडाचे संवर्धन झाले नाही. त्यामुळे गडावरील दोन्ही तोफा दोनशे वर्षापासून गडाच्या नजीकच्या दरीत कोसळून खाली पडल्या होत्या. सह्याद्री प्रतिष्ठानने ही बाब हेरली. त्यांनी कल्याण विभागासह राज्यातील अन्य दुर्ग भ्रमण करणा:या दरी गाठली. दरीतून या तोफा गडावर आणल्या आहे. त्यांना नवसंजीवनी देत या तोफा गडावर ज्या ठिकाणी होत्या. त्याच ठिकाणी ठेवण्याचे काम केले आहे. या तोफांचे वजन दोन हजार किलो आहे. शेकडो दुर्गसेवकांनी श्रमदान करीत एकीचे बळ दाखविल्याने या तोफा गडावर नेता आल्या. राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळाले. पंधरा तास दुर्ग सेवकांनी अन्न पाणी ग्रहण न करता या तोफा गडावर वाहून नेल्या. या शिवकार्यात कल्याण विभागाचे भूषण पवार, वैष्णवी, गौरे, सोमनाथ पांचाळ, राहूल पवार, अभिषेक चव्हाण, स्वप्नील परब, शैलेश घोलप आणि दिनेश पादारे यांचासह शेकडो दुर्ग सेवकांचा सहभाग होता.