शहापूर परिसरातील २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; ३ लाख ८ हजार रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे

By अनिकेत घमंडी | Published: March 14, 2023 05:59 PM2023-03-14T17:59:00+5:302023-03-14T17:59:08+5:30

महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case registered against 23 electricity thieves in Shahapur area; 3 lakh 8 thousand cases of electricity theft | शहापूर परिसरातील २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; ३ लाख ८ हजार रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे

शहापूर परिसरातील २३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; ३ लाख ८ हजार रुपयांच्या वीजचोरीची प्रकरणे

googlenewsNext

डोंबिवली: महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस आणलेल्या टिटवाळा येथील २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईनंतर वीजचोरीचे देयक व तडजोडीची रक्कम न भरल्याने गुन्हा दाखल होण्यासाठी सहायक‍ अभियंता आदित्य जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हे गुन्हा दाखल झाले आहेत.

महावितरणच्या पथकाने दखनेपाडा, तांबडमाळ, मामनोली, आवाळे, आंबेडोह, बेरसिंगपाडा, वालशेत, काजळविहीर, वालशेतपाडा, सावरोली, चिमपाडा आणि मोहपाडा भागात वीजचोरी शोध मोहिम राबवली होती. या कारवाईत २३ जणांकडे वीजचोरी सुरू असल्याचे आढळले होते. त्यानुसार त्यांनी वापरलेल्या चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत सूचित करण्यात आले.

मात्र संबंधितांनी या रकमेचा भरणा न केल्याने त्यांच्याविरुद्ध फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मुरबाड पोलिसांनी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करत आहेत. शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Case registered against 23 electricity thieves in Shahapur area; 3 lakh 8 thousand cases of electricity theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.