वाडा परिसरातील सहा वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; सव्वा पाच लाखांची वीजचोरी उघडकीस

By अनिकेत घमंडी | Published: June 28, 2024 03:08 PM2024-06-28T15:08:28+5:302024-06-28T15:08:45+5:30

 डोंबिवली: महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा ...

Case registered against six electricity thieves in Wada area; Electricity theft of 5.5 lakhs revealed | वाडा परिसरातील सहा वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; सव्वा पाच लाखांची वीजचोरी उघडकीस

वाडा परिसरातील सहा वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल; सव्वा पाच लाखांची वीजचोरी उघडकीस

 डोंबिवली: महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा जणांविरूद्ध वीज कायदा नुसार जव्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडील ५ लाख १९ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. त्यासंदर्भात महावितरणने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार सुधाकर कराळे, दिलीप पाटील (‍शिवाजीनगर)‍, दिलीप भानुशाली (भानुशाली आळी), शिवाजी फुलवडे (समर्थनगर), आतिश पाटील (किरवली), राजु गुरोडा (पाली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली वाडा उपविभागात वीजचोरी शोध मोहिम सातत्याने सुरू आहे. या मोहिमेत संबंधित आरोपींकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत‍ नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने वाडा शहर शाखेचे सहायक अभियंता राधेशाम कुमावत व वाडा ग्रामीण शाखेचे सहायक अभियंता निरज कुमार यांनी जव्हार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जव्हार पोलिस ठाण्यात २७ जून, गुरुवारी रात्री उशिरा सहा जणांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा असून या गुन्ह्यात कडक शिक्षा व दंडात्मक कारवाईची तरतूद असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Case registered against six electricity thieves in Wada area; Electricity theft of 5.5 lakhs revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.