सिमेंट मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल, टेम्पोसह पाच रिक्षांना धडक
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2025 13:55 IST2025-03-08T13:54:23+5:302025-03-08T13:55:59+5:30
कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे एक टेम्पोसह चार ते पाच रिक्षांना जोरदार धडक दिली.

सिमेंट मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल, टेम्पोसह पाच रिक्षांना धडक
कल्याण- कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवर सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे एक टेम्पोसह चार ते पाच रिक्षांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की या अपघातात एका रिक्षासह टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला. टेम्पोमध्ये अडकलेल्या अमेय आडे या टेम्पो चालकाची अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर अवस्थेत सुटका करत. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . या अपघातात रिक्षा चालकासह इतरही पाच जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या सिमेंट मिक्सरच्या मागे आणखीन एक सिमेंट मिक्सर येत होता. सिमेंट मिस्कर ट्रक दुभाजकावर धडकला त्यामुळे मोठा अनर्थ टळला . या अपघातानंतर सिमेंट मिक्सर ट्रक चालक पसार झाला आहे.
कल्याण पूर्वेत पूना लिंक रोडवर सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या मिक्सर ट्रकचे नियंत्रण सुटले . या मिक्सर ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या तीन ते चार रिक्षा तसेच एका टेम्पोला जोरदार धडक दिली . ही धडक इतकी भयानक होती की या धडकेत टेम्पोचा आणि रिक्षाचा चक्का चुराडा झाला. टेम्पो चालक हा चेपलेल्या टेम्पो मध्ये अडकला होता. हे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी अग्निशमन विभाग तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर या जखमी अवस्थेतील टेम्पो चालकाला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाकल केले आहे. या अपघातात दोन रिक्षा चालकांसह दोन प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती आहे . याच दरम्यान या सिमेंट मिक्सर ट्रकच्या पाठीमागून येणारा दुसरा मिक्सर ट्रक देखील अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकला सुदैवाने पुढील अनर्थ टळला या अपघातामुळे कल्याण पूर्व पुना लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.