एक्सप्रेसच्या २ डब्यातून धूर आल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By अनिकेत घमंडी | Published: September 23, 2022 12:27 PM2022-09-23T12:27:30+5:302022-09-23T12:27:45+5:30
लोकल खोळंबा होऊ नये यासाठी ती गाडी काही वेळाने टिटवाळा स्थानकापर्यंत धावली आणि तिथे सायडिंगला उभी करण्यात आली
डोंबिवली - रेल्वे सेवा विस्कळीत होण्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत, शुक्रवारी देखील रांची एलटीटी अप एक्स्प्रेसमधील दोन डब्यातून धूर येत असल्याने तो गाडी वसिंद रेल्वे स्थानकात सकाळी ११.३० वाजतक काही काळ थांबवली होती, त्यामुळे त्या मागील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्याचा फटका दुपारच्या सत्रात कामावर जाणाऱ्या तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला.
लोकल खोळंबा होऊ नये यासाठी ती गाडी काही वेळाने टिटवाळा स्थानकापर्यंत धावली आणि तिथे सायडिंगला उभी करण्यात आली. त्यांच्यानंतर मागे खोळम्बलेल्या कसारा येथून मुंबई ला निघालेली लोकल पुढे नेण्यात आली. त्यामागे आणखी एक लोकल असल्याचे सांगण्यात आले. लांबपल्याच्या गाड्या मुंबईत येताना त्या लोकलच्या वेळापत्रकाआड येत असल्याने लोकलचा खोळम्बा होतो, त्याचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.