सेंच्युरी कंपनी टँकर स्फोट प्रकरण : मृतांच्या कुटुंबीयांना १३ लाख नुकसान भरपाईसह नोकरी व हक्काचे घर

By सदानंद नाईक | Published: September 27, 2023 04:41 PM2023-09-27T16:41:16+5:302023-09-27T16:41:52+5:30

मुलांच्या इयत्ता दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे.

Century Company Tanker Blast Case: 1.3 Lakhs compensation to the families of the deceased, along with job and housing rights | सेंच्युरी कंपनी टँकर स्फोट प्रकरण : मृतांच्या कुटुंबीयांना १३ लाख नुकसान भरपाईसह नोकरी व हक्काचे घर

सेंच्युरी कंपनी टँकर स्फोट प्रकरण : मृतांच्या कुटुंबीयांना १३ लाख नुकसान भरपाईसह नोकरी व हक्काचे घर

googlenewsNext

उल्हासनगर : सेंच्युरी कंपनीतील टँकर स्फोटात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबांना १३ लाख आर्थिक मदत, एका वारसदाराला कायम नोकरीसह हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. तसेच मुलांच्या इयत्ता दहावी पर्यंतचा शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील सेंच्युरी कंपनीत शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता स्फोट होऊन, स्फोटात टँकर चालक पवन यादव यांच्यासह कंपनीचे कामगार शैलेश यादव, राजेश श्रीवास्तव व अनंता डोंगोरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ कामगार जखमी झाले. याप्रकरणी कंपणीवर गुन्हा दाखल झाला. कंपनीला खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन स्फोटाच्या चौकशीची मागणी केली. 

तसेच मृत कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला १३ लाखाची मदत, एका वारसदाराला कायम नोकरी व मुलांच्या इयत्ता १० पर्यंत शिक्षणाचा खर्च कंपनी उचलणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. यामुळे मृत कामगारांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान कंपनी प्रशासना सोबत कामगार संघटने चर्चा केल्यांनंतर मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली आहे.

सेंच्युरी रेयॉन कंपनीत ३५०० कायम कामगार, २५०० कंत्राटी कामगार व ५०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा स्टॉप असे एकून ६ हजार कर्मचारी कंपनीत कार्यरत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ललका यांनी दिली. कंपनीच्या सुरक्षेला कंपनीने प्राधान्य दिल्याचे ललका म्हणाले. कंपनीत स्फोट झाला. त्यावेळी ६ हजार कामगाराच्या कंपनीत कामगार संघटना व त्यांचे नेते, पदाधिकारी कुठेच दिसले नाही, असे चित्र होते. 

जनशक्तीचे शैलेश तिवारी यांनी संध्याकाळी काही कार्यकर्ते व कामगाराच्या कुटुंबा सोबत कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन व घोषणाबाजी केल्यावर, कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले होते. दरम्यान पोलीस व कंपनी देत असलेल्या माहितीत तफावत होती. कंपनी प्रशासनाकडून २ मृत, २ मिसिंग व ४ कामगार जखमी झाल्याची माहिती दिली होती. तर पोलिसांनी ४ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाल्याचे सांगत होते. 
 

Web Title: Century Company Tanker Blast Case: 1.3 Lakhs compensation to the families of the deceased, along with job and housing rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.