उल्हासनगरात चालिया उत्सवाला सुरुवात; सिंधी बांधवाची एकच गर्दी
By सदानंद नाईक | Published: July 14, 2023 05:28 PM2023-07-14T17:28:01+5:302023-07-14T17:28:28+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात १३ जुलै पासून ४० दिवसाच्या व्रताला सुरवात झाली
सदानंद नाईक
उल्हासनगर : सिंधी समाजाच्या पवित्र चालिया उत्सवाला चालिया मंदिरात गुरवार पासून सुरू झाला आहे. चाळीस दिवस मंदिरात भजन, आरती आदी कार्यक्रम सुरू राहणार असून सिंधी बांधव श्रावण महिन्या प्रमाणे आपले व्रत सुरू करतात.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात १३ जुलै पासून ४० दिवसाच्या व्रताला सुरवात झाली. सिंधी समाज चाळीस दिवस उपवास करून भगवान झुलेलाल यांची पूजा चर्चा करतात. प्रसिद्ध चालिया मंदिरात चाळीस दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चाळीस व्या दिवशी पाण्याच्या हौदात मटके फोडून सिंधी बांधव व्रत पूर्ण करतात. मंदिरात पाकिस्तान येथील चालिया मंदिरातून आणलेली ज्योत गेली ७५ वर्ष अखंड तेवत आहे. पवित्र ज्योत पाहण्यासाठी व झुलेलाल यांचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातील लाखो सिंधी बांधव चालिया मंदिराला भेट देतात.
चालिया उत्सवा दरम्यान महिला वेगवेगळ्या चार ते पाच धान्याच्या पिठाचा दिवा लावून भगवान झुलेलाल यांची आराधना करतात. चालिया उत्सवात भगवान झूलेलाल हे वरूणदेव याचा अवतार घेत असल्याचे बोलले जाते. चालिया उत्सवा निमित्त।मंदितात भाविकांची गर्दी झाली असून मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिसरात साफसफाई करण्यात आली आहे.