चलती है क्या बाहेर प्रकरण : अखेर उल्हासनगर महापालिका विशाखा समितीकडे महिला कर्मचाऱ्यांची तक्रार!
By सदानंद नाईक | Published: July 31, 2023 11:43 PM2023-07-31T23:43:35+5:302023-07-31T23:44:13+5:30
महापालिका मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्तां प्रियांका रजपूत हया महिला कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मागे उभ्या ठाकल्या आहेत.
उल्हासनगर : महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्याने चलती है क्या बाहेर असे म्हटल्याची तक्रार आयुक्तांकडे केल्यानंतर, सोमवारी महापालिका विशाखा समितीकडे महिला कर्मचारी यांनी केली. समितीच्या अध्यक्षा अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी याला दुजोरा देऊन, संबंधित अधिकारर्याला नोटीस काढण्याचे संकेत दिले.
उल्हासनगर महापालिकेचा एक वरिष्ठ अधिकाऱ्याने, महिला लिपिक कर्मचारी पिंजारी यांना चलती है क्या बाहेर असे बोलल्याची तक्रार आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली होती. हा प्रकार उघड झाल्यावर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. महिला कर्मचारी व आयुक्तांनी अधिकाऱ्यांचे नाव उघड न केल्याने, अधिकाऱ्यांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. सोमवारी महिला कर्मचारी पिंजारी यांनी महापालिका विशाखा समितीकडे रीतसर तक्रार केली असून समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांनी तक्रार केल्याच्या वृत्ताला दुजोरो दिला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याला याबाबत खुलासा मागितल्याची नोटीस दिल्याची माहिती जुईकर यांनी दिली आहे.
महापालिका मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्तां प्रियांका रजपूत हया महिला कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मागे उभ्या ठाकल्या आहेत. तर काही जणांनी महिला कर्मचारी ज्या विभागात काम करतात, त्या विभागाच्या अनियमित कामावर वरिष्ठ अधिकाऱ्याने आक्षेप घेऊन, चौकशी करण्याचे आदेश दिले. यातूनच महिला कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. विशाखा समितीच्या चौकशी नंतरच खरे कारण उघड होणार आहे. सोमवारी महापालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर झालेल्या आरोपाचीच चर्चा होती.