चंदेरी सोनेरीकार प्रख्यात मुलाखतकार अशोक शेवडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:45 AM2021-03-18T10:45:13+5:302021-03-18T10:45:38+5:30
समाजातील विविध चांगक्या गोष्टी हेरून त्या दूरदर्शन अथवा रेडिओ आदी माध्यमातून जगासमोर आणून त्या कार्याचा प्रचार, प्रसार करण्याचा कार्यक्रम त्यांनी आजीवन केल्याच्या असंख्य आठवणी त्यांच्या काळातील जुन्या सहकाऱ्यांनी लोकमत समवेत शेअर केल्या.
डोंबिवली : प्रख्यात मुलाखतकार अशोक शेवडे (७७) यांचे अल्प आजारामुळे गुरुवारी सकाळी डोंबिवलीत निधन झाले. 5 हजार मुळखतींचा बादशहा अशी त्यांची ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिगदर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या. स्टेट बँकेतुन त्यांनी व्हीआरएस घेऊन नंतर पूर्णपणे मुलाखत घेण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. जुन्या काळी दूरदर्शनवर दर शुक्रवारी त्यांची विशेष व्यक्तिमत्व सोबत मुलाखत कार्यक्रम होत असे
कायम झब्बा घातलेले नीटनेटके व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. समाजातील विविध चांगक्या गोष्टी हेरून त्या दूरदर्शन अथवा रेडिओ आदी माध्यमातून जगासमोर आणून त्या कार्याचा प्रचार, प्रसार करण्याचा कार्यक्रम त्यांनी आजीवन केल्याच्या असंख्य आठवणी त्यांच्या काळातील जुन्या सहकाऱ्यांनी लोकमत समवेत शेअर केल्या. अशोक शेवडे यांनी सुमारे 5 हजार मुलाखती घेतल्या. समाजातील विविध क्षेत्रातील संस्थाना त्यांनी प्रकाशझोतात आणले. कोरोना काळानंतर आम्ही आठवणी चंदेरी सोनेरी या कार्यक्रमाचा 400 वा भाग सादर करणार होतो, त्याची तयारीही झाली होती, परंतु त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना बरेच दिवस आर आर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ ठेवण्यात आले होते. अखेर, आज त्यांची प्राणज्योत मालवली.