स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधणार 

By अनिकेत घमंडी | Published: April 5, 2023 06:26 PM2023-04-05T18:26:23+5:302023-04-05T18:26:53+5:30

स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

chandrashekhar bawankule said that various programs have been organized by BJP on the occasion of the foundation day  | स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधणार 

स्थापना दिनानिमित्त भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन; ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधणार 

googlenewsNext

डोंबिवली : भाजपतर्फे ६ एप्रिल रोजी पक्ष स्थापना दिनानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुढील वर्षभरात ६ राज्यातील ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी सरकारच्या तसेच राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल , अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली . भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन  आदी यावेळी उपस्थित होते. 

बावनकुळे म्हणाले की, स्थापना दिनानिमित्त केंद्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या सर्व बूथ समित्यांवर स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील ९७ हजार बुथवर राष्ट्रवादी , काँग्रेस , उद्धव ठाकरे गट अशा वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेशाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही ध्वजारोहण होणार आहे.        

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत ५१ टक्के मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान पक्षाने सुरु केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम संघटनेमार्फत राबविण्यात येणार आहे. ७८२००७८२०० या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या विविध योजनांची माहिती अॅपमार्फत मतदारांपर्यंत पोहचवली जाईल. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पक्षाचे प्रदेश स्तरावरील ७०० पदाधिकारी  या अभियानात सहभागी होतील.  विविध समाज घटकांमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल अन्य पक्षांनी निर्माण केलेले गैरसमज दूर केले जातील, असेही बावनकुळे म्हणाले.

 

Web Title: chandrashekhar bawankule said that various programs have been organized by BJP on the occasion of the foundation day 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.