डोंबिवलीतील नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी; दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास, MIDC अधिकाऱ्यांनी घेतली धाव

By मुरलीधर भवार | Published: October 19, 2022 02:18 PM2022-10-19T14:18:08+5:302022-10-19T14:18:45+5:30

सापडले रिकामे ड्रम : पोलिस ठाण्यात तक्रार

chemical waste water discharged into a drain in dombivli due to stench citizens are disturbed | डोंबिवलीतील नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी; दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास, MIDC अधिकाऱ्यांनी घेतली धाव

डोंबिवलीतील नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी; दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास, MIDC अधिकाऱ्यांनी घेतली धाव

Next

डोंबिवली-येथील खंबाळपाडा परिसरात बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारतीच्या आवारातील नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आले. त्यामुळे काल रात्री नागरीकांना प्रदूषणाचा त्रस झाला. नागरीकांनी याची माहिती कळविताच घटनास्थळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिका:यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी केमिकल्सचे रिकामे ड्रम जप्त करण्यात आले असून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

प्रदूषणाची समस्या डोंबिवलीतील नागरीकांनी गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे. काल रात्री खंबाळपाडा परिसरात केमिकल युक्त दु्र्गंधीचा त्रास येऊ लागल्याने जागरिक नागरीक काळू कोमास्कर यांनी या संदर्भात प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या अधिका:यासह एमआयडीसी आणि कामा या कारखानदारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. 

रासायनिक सांडपाणी कोणत्या कंपनीतून सोडण्यात आले. त्यामुळे नागरीकांना प्रदूषणाचा त्रस झाला याचा शोध आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये घेण्यात आला. त्यावेळी कंपन्यामधून सांडपाणी सोडले गेले नसल्याने एका ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या आवारातील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीने टेम्पो नेऊन त्या टेम्पोतील केमिकल्सचे ड्रम नाल्यास सोडले होते. त्यामुळे नागरीकांना त्याचा त्रस झाला. 

सापडलेले केमिकल्सचे १५ ड्रम जप्त करण्यात आले असून केमिकल नाल्यास सोडणा:या अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.

केमिकल्सच्या ड्रमना एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेत वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रासायनिक सांडपाणी आत्ता एमआयडीसी परिसरात न सोडता ते अशा कुठल्याशा अडोशाला असलेल्या जागी सोडले जाते. या जागांवर आत्ता पोलिस यंत्रणोसह प्रदूषण नियंत्रणाच्या मंडळांनी गस्तीच्या माध्यमातून लक्ष ठेवले पाहिजे अशी मागणी जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी केली आहे.

फेब्रूवारी २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीतील प्रदूषण समस्येची गंभीर दखल घेत. प्रदूषण रोखण्यासाठी कंपन्याना कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नुतकेच विद्यमान सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रदूषण रोखण्यासाठी लवकर बैठक घेतली जाईल असे आश्वासान महिन्याभरापूर्वीच दिले होते. मात्र अद्याप काही बैठक झालेली नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: chemical waste water discharged into a drain in dombivli due to stench citizens are disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.