कल्याण डोंबिवलीला कोविडशिल्ड लसीचे 6 हजार डोस प्राप्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:40 PM2021-01-13T20:40:25+5:302021-01-13T20:44:23+5:30
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा:यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत.
कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रसाठी राज्य सरकारकडून कोविड शिल्डच्या 6 हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहे. लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचा:यांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चार लस केंद्रे आहेत. रुक्मीणीबाई रुग्णालय, कल्याणमधील शक्तीधाम केंद्र आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय, डीएनसी शाळा याठिकाणी प्रत्येक दिवशी 100 जणांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील पहिला डोस दिल्यानंतर दुस:या टप्प्यातील डोस 28 दिवसांनी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्द ही कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. आत्तार्पयत कोरोनामुळे महापालिका हद्दीत 1 हजार 118 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लस न आल्याने अनेकांना त्यांच्या जिविताची धास्ती होती. लसीकरणास सुरुवात झाल्याने सगळ्य़ांकडून या लसीकरणाचे स्वागत होत आहे. आत्ता किती लोक लस स्वत:हून घेण्यास उत्सूक आहेत हे प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. कारण 10 टक्के लोकांमध्ये लसीमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात अशी भिती आहे