ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 07:32 PM2023-01-27T19:32:52+5:302023-01-27T19:34:14+5:30

 ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाची पाहणी केली. 

 Chief Minister Eknath Shinde inspected the work after the Airoli to Katai subway blast   | ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी 

ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कामाची पाहणी 

googlenewsNext

कल्याण: कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगद्यात ब्लास्टिंग करण्यात आले. या ब्लास्टिंगमुळे हा बोगदा एकमेकांना जोडला जाणार जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने आकारास येत असलेल्या या मार्गाच्या बांधकामास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर वेग आलाय. येण्यासाठी एक आणि जाण्यासाठी एक आशा दोन मार्गिका या मार्गावर असून त्यातील पहिली मार्गिका खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

या मार्गामुळे नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीचे अंतर अंदाजे सात किलोमीटरने कमी होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. आज झालेल्या ब्लास्टनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन या बोगद्यातील कामाची पाहणी केली. सध्या या भागातील रहिवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा मार्ग पूर्ण झाल्यास हा त्रास कायमचा दूर होणार आहे. नोव्हेंबर 2023 पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यावेळी एमएमआरडीए आयुक्त एस सी आर श्रीनिवास आणि एमएमआरडीएचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title:  Chief Minister Eknath Shinde inspected the work after the Airoli to Katai subway blast  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.