डोंबिवलीत विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
By मुरलीधर भवार | Published: November 10, 2022 05:33 PM2022-11-10T17:33:29+5:302022-11-10T17:35:23+5:30
मानपाडा रोडचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जाणार आहे. या कामाचाही शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.
कल्याण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या रविवारी डोंबिवलीत विकास कामांच्या शुभारंभाकरीता उपस्थित राहणार आहे. त्यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. १३ नोव्हेंबर रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत येणार आहेत. डोंबिवली औद्योगिक निवासी भागातील रस्ते विकास कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या विकास कामाकरीता एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे. या रस्ते विकास कामाचा शुभारंभ डोंबिवली नांदिववली मठ मंदीर परिसरात केला जाणार आहे.
मानपाडा रोडचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जाणार आहे. या कामाचाही शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे. या कामाच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्र्यांची सभा त्याच ठिकाणी होईल. ते त्याठिकाणी उपस्थितांना संबोधित करणार आहे. या सभेनंतर ते डोंबिवलीतील बाळासाहेबांच्या शिवसेना शहर शाखेला भेट देणार आहे. या कार्यक्रमास कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे अशी माहिती उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी दिली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.