बालनाट्य स्पर्धा दिलीप प्रभावळकर यांना समर्पित; श्रीकला संस्कार न्यास आयोजित ४१वी बालनाट्य स्पर्धा
By अनिकेत घमंडी | Updated: October 2, 2023 14:00 IST2023-10-02T13:59:40+5:302023-10-02T14:00:15+5:30
प्रभावळकर यांनी सर्व शाळा संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

बालनाट्य स्पर्धा दिलीप प्रभावळकर यांना समर्पित; श्रीकला संस्कार न्यास आयोजित ४१वी बालनाट्य स्पर्धा
डोंबिवली: येथील श्रीकला संस्कार न्यास व श्री लक्ष्मीनारायण संस्था आयोजित ४१ वी बालनाट्य स्पर्धा यंदा जेष्ठ रंगकर्मी, लेखक, अभिनेते आदरणीय दिलीप प्रभावळकर यांना समर्पित करण्यात आली आहे. श्रीकला संस्कार न्यास च्या सभासदांनी खास पुण्यात जाऊन त्यांना निमंत्रण दिले. यावेळी दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या चष काचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रभावळकर यांनी सर्व शाळा संस्थांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
सदर स्पर्धा २६, २७ व २८ डिसेंबर रोजी डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात संपन्न होणार असून इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते १० वी अश्या २ गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. गट क्रमांक १ ला रोख रू.३०००/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र तर गट क्रमांक २ साठी रोख रू. ५०००/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र इत्यादी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा ज्योती दाते यांनी सांगितले.