कल्याणमधील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांचे शाळेसमाेर रास्ता राेकाे आंदाेलन
By मुरलीधर भवार | Published: January 16, 2023 06:22 PM2023-01-16T18:22:47+5:302023-01-16T18:23:02+5:30
शहराच्या पश्चिम भागातील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेसमाेरच रास्ता राेकाे आंदाेलन केले.
कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेसमाेरच रास्ता राेकाे आंदाेलन केले. पालकांच्या या आंदाेलनाची दखल घेत या विषयावर येत्या गुरुवारी शाळा व्यवस्थापनाकडून बैठक आयाेजित करण्यात आले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पाेदार शाळेने सीआयई बाेर्ड बंद केल्याने पालकांना माेठा धक्का बसला. शाळेने घेतलेल्या या निर्णयाच्या विराेधात जाब विचारण्यासाठी पालक शाळेसमाेर जमा झाले. पालकांनी संताप व्यक्त करीत शाळेसमाेर रस्त्यावरच रास्ता राेकाे करुन निषेध व्यक्त केला.शाळेने आज सकाळी पालकांना मेसेज पाठवून मिटिंंगसाठी बाेलविले हाेते. विद्यार्थ्यांची शालेय फी भरताना काेणत्याही प्रकारे तडजाेड केली जाणार नाही असे सांगण्यात आले हाेते. शाळेने असा निर्णय घेतल्याने शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आराेप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासनाने पालकांची बाजू एेकून न घेता एकतर्फी निर्णय कसा काय आणि कशाच्या आधारे घेतला असा सवाल पालक वर्गाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
शाळेने घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशी आग्रही मागणी पालकांनी यावेळी केली. शाळा भरमसाठ फी वसूल करते. फी वसूल करुन देखील सीआयई बाेर्ड कशाच्या आधारे बंद करीत आहे. शाळेने बाेर्ड बंद करुन २० टक्के फीचा परतावा देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र आम्ही फी भरली हाेती. आम्हाला फी परत नकाे तर आमच्या मुलांना चांगले शिक्षण हवे अशी पालकांची मागणी आहे.
पालकांचा हा असंताेष पाहता शाळा प्रशासनाने सीआयई बाेर्ड बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी पालकांचेही म्हणणे एेकून घेतले जाणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी बैठक बाेलाविण्यात आली आहे. या बैठकीत पालक आणि शाळा प्रशासन यांच्या चर्चा केली जाईल. या चर्चेतून या प्रश्नावर ताेडगा काढला जाईल असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.