नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे

By सचिन सागरे | Published: August 20, 2023 03:54 PM2023-08-20T15:54:54+5:302023-08-20T15:55:07+5:30

सध्या वातावरणात बदल होत आहेत त्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ही निर्माण होत आहे.

Citizens have not only a tendency to blame but also a mindset to work with the government | नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे

नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे

googlenewsNext

कल्याण : सध्या वातावरणात बदल होत आहेत त्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ही निर्माण होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हा एकच मार्ग आहे. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबर काम करण्याची मानसिकता ही दिसून येते. प्रशासन व नागरिक एकत्र आल्यास निश्चितपणे परिस्थिती बदलू शकते असे कौतुकोद्गार आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी वृक्षारोपण प्रसंगी काढले.

आंबिवली रिंगरोडवर राबवण्यात आलेल्या ग्रीन स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणकरांनी नविन इतिहास घडवला. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच, केडीएमसी आणि एका खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य नागरिक एकत्र आले. 

रिंगरोडच्या टिटवाळा आंबिवली भागात आज सकाळी ग्रीन स्माईल उपक्रम राबवण्यात आला. या रिंगरोडवर दोन किलोमीटरपर्यंत दोन्ही भागांत वेगवेगळ्या देशी प्रजातीच्या झाडांची रोपे लावण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था आणि पाच वर्षांच्या चिमुरडीपासून ते ९० वर्षांच्या आजीबाईंपर्यंत शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

कल्याणकरांनी ही सर्व झाडे स्वखर्चातून लावली असून ती जगविण्यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक झाडाची देखभाल करण्यासाठी आयएमए, कल्याणने विशेष संस्था नियुक्त केली आहे. तर आज ज्या व्यक्तींनी झाडे लावली त्यांच्या नावाचे बोर्ड त्या झाडांवर लावण्यात आले आहेत. 

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकता मानव वृक्ष, डॉ. आनंदी गोपाळ यांच्या नावाचा, कोविडशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून आणि देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून एक अशा पाच मानाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. 

यावेळी केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण संस्कृती मंच अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव श्रीराम देशपांडे, खजिनदार अतुल फडके, रौप्य महोत्सवी गुढीपाडवा स्वागत यात्रेचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील,  हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याण अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर, सचिव विकास सुरंजे, डॉ अश्विन कक्कर, डॉ. राजेश राजू, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. नितीन चिटणीस, डॉ. भाग्यश्री मोघे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Citizens have not only a tendency to blame but also a mindset to work with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.