पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्याला जागेवर बसू देणार नाही, शिंदे सेनेच्या शहर प्रमुखांचा प्रशासनाला इशारा
By मुरलीधर भवार | Published: September 20, 2024 07:01 PM2024-09-20T19:01:44+5:302024-09-20T19:02:03+5:30
यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.
कल्याण- हलक्यात घेऊ नका , नागरिकांना पाणी मिळाले नाही तर एकाही अधिकाऱ्याला जागेवर बसून देणार नाही. कल्याण डाेंबिवली महापालिकेस टाळे ठोकू अशी तंबी शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिली.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवलीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाई समस्येबाबत शहर प्रमुख गायकवाड यांनी महापालिकेच्या आय प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.
नागरिक कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त आहेत .पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी प्रशासनाला यापूर्वीच निवेदने दिली आहे. आंदोलने केली आहेत. पाठपुरावा करुन देखील पाणी समस्या सुटलेली नाही .आज शहर प्रमुख गायकवाड यांच्या पुढाकाराने महिलांनी आय प्रभाग कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढला.