कल्याणमध्ये दहावीचा वर्ग भरला, केडीएमसीकडून कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 02:52 PM2021-02-25T14:52:48+5:302021-02-25T14:53:36+5:30

Kalyan : याबाबत विचारणा केली असता दहावीची परीक्षा असल्याने मुलींना एका दिवसाकरीता वर्गात बोलविले होते, असे शाळेकडून सांगण्यात आले.

Class X start in Kalyan, action from KDMC! | कल्याणमध्ये दहावीचा वर्ग भरला, केडीएमसीकडून कारवाई!

कल्याणमध्ये दहावीचा वर्ग भरला, केडीएमसीकडून कारवाई!

Next
ठळक मुद्देकोरोना वाढत असताना पुन्हा सोशल डिस्टसिंगविषयी महापालिका प्रशासन आग्रही झाले आहे.

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील जोशी बागेतील एम. जे. बी. या शाळेत दहावीचा वर्ग भरला असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांना कळताच शाळेच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, तेव्हा कोरोनाचा हॉटस्पॉट महापालिका क्षेत्र होते. त्यानंतर कोरोनाची संख्या घटली. कोरोनाची संख्या कमी होत असताना पुन्हा कोरोनाची संख्या वाढत आहे. कोरोना वाढत असताना पुन्हा सोशल डिस्टसिंगविषयी महापालिका प्रशासन आग्रही झाले आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, ही सगळी उपाययोजना आखली जात असताना जोशीबागेतील एम. जे. बी. शाळेत दहावीचा वर्ग भरला होता. 

दहावीच्या वर्गात मुली सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या ठिकाणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे पोहोचले. तेव्हा शाळेतील मुली बाहेर पडल्या, तर  काही मुलांच्या तोंडावर मास्क होता. काही मुलींच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे शाळेच्याविरोधात महापालिकेने कारवाई केली आहे. याबाबत विचारणा केली असता दहावीची परीक्षा असल्याने मुलींना एका दिवसाकरीता वर्गात बोलविले होते, असे शाळेकडून सांगण्यात आले. मात्र, हा वर्ग दररोज भरविला जात असल्याची कुजबूज शाळा परिसरात ऐकावयास मिळाली. 
 

Web Title: Class X start in Kalyan, action from KDMC!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.