अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत ग प्रभागात सर्वंकष स्वच्छता अभियान
By अनिकेत घमंडी | Published: February 16, 2024 06:33 PM2024-02-16T18:33:22+5:302024-02-16T18:34:38+5:30
सर्वंकष अभियान राबविण्यात आले.
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता अभियान दर आठवड्यात महापालिका क्षेत्रात विविध प्रभागात राबविण्यात येत आहे. शुक्रवारी करण्यात आलेले स्वच्छता अभियान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने उपायुक्त अतुल पाटील यांचे निर्देशानुसार मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार यांच्या मदतीने २० पथकांच्या सहाय्याने ८/ग प्रभाग क्षेत्रात राबविण्यात आले.
डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी चौक ते जकात नाका मानपाडा रोड, डोंबिवली रेल्वे स्टेशन अनुकुल हॉटेल ते मुकूंद पेडणेकर यांचे कार्यालय राजाजी पथ, केळकर रोड ते मंदार हळबे यांचे कार्यालय, फडके वॉच चार रस्ता ते घोडे चौक राजेंद्र प्रसाद रोड, राजाजी पथ गल्ली क्र. १ ते ४, झायका हॉटेल ते मॉडेल कॉलेज निर्मल सोसायटी, आयकॉन हॉस्पीटल ते सुर्यकिरण सोसायटी, दत्तनगर चौक ते कोपर ब्रिज टंडन रोड, दत्तनगर चौक डीएनसी कॉलेज ते बहीणाबाई चौधरी गार्डन सुनिल नगर, प्रगती कॉलेज ते नांदीवली नाला, मी आयरेकर चौक ते आयरे स्मशान भूमी ते कोपर स्टेशन, दत्तनगर नागरी आरोग्य केंद्र ते राजकिर्ती सोसायटी, मुकूंद पेडणेकर कार्यालय ते लालबहादूर शास्त्री शाळा आयरे गांव, गांवदेवी मंदिर ते जैनमंदिर, रामरतन ते सुर्यकिरण सोसायटी या परिसरात ही सर्वंकष अभियान राबविण्यात आले.
या अभियानात २ डस्ट मेटिगेशन वाहने, ट्रॅक्टर, टँकर इ. साहित्याच्या सहाय्याने रस्ते व पदपथ तसेच दुभाजक धुवून स्वच्छ करण्यात आले.