कल्याणच्या गिर्यारोहकांनी पहिने सुळक्यावर फडकविला तिरंगा आणि भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 03:39 PM2021-11-15T15:39:01+5:302021-11-15T15:39:11+5:30
एका तासाभरात मोहिम सर, या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लक्ष्मण पाडा येथून जाली. सुरुवातीच्या टप्प्यात शेता लगत बांधा बांधाने जात एक लहानसा ओढा पार करावा लागतो
कल्याण - सह्याद्रीच्या द:या खो:यात गिर्यारोहनासाठी कठीण श्रेणीत मोडणा:या सुळक्यांची संख्या जास्त आहे. त्यापैकी एक पहिने सूळक्याची चढाई आणि २०० फूट खोल दरीववर ओव्हर हँग असल्याने हा सुळका अजून भयंकर वाटतो. अशा पहिने सुळक्यावर काल बालदिनानिमित्त कल्याणच्या गिर्यारोहकांनी तिरंगा आणि भगवा ध्वज फडकवित छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.सह्याद्री रॉक अडव्हेंचर या गिर्यारोहक समूहाच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजीत भोसले, भूषण पवार, प्रदीप घरत, अक्षय जमदरे, सागर डोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेश पाटील, लतिकेश कदम, सुनिल खनसे आदी सदस्यांनी हा सुळका सर केला आहे.
या मोहिमेची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लक्ष्मण पाडा येथून जाली. सुरुवातीच्या टप्प्यात शेता लगत बांधा बांधाने जात एक लहानसा ओढा पार करावा लागतो. पुढे घनदाट जंगल सुरु होते. त्यानंतर खडय़ा चढाईचा मार्ग पहिने सुळक्याच्या पायथ्या जाऊन पोहचतो. सुळका आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. खडकांच्या खाच्यांमध्ये हाता पायांच्या बोटाने मजबूत पकड करुन चिकाटीने चढाई करावी लागते. अंगावर येणारा खडक हा गिर्यारोहकांच्या मानसिक आमि शारीरीक कसोटी पाहणारा आहे. सुळक्याचा खडक काही ठिकाणी सैल आणि निसरडा असल्याने जपून आरोहण करावे लागते असा सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी सांगितला. काळजाचे ठोके चुकविणारा सुळक्याचा खडतर निसरडा मार्ग आणि बाजूला असलेली खोल दरी त्यात हुडहुडी भरविणारी थंडी, कातळकडे आहेत. एक चुकीचे पाऊल खोल दरीत विश्रंती देऊ शकते. त्याठीकाणी चुकीला माफी नाही असे हे ठीकाण आहे. या सर्व आव्हानांचा सामना करीत ही चढाई करण्यात आली. हा समूह नवीन गिर्यारोहकांसाठी घेऊन येतो. पहिने मोहिमेला लहान बालकांची उपस्थिती होती. बाल दिनाचे महत्वा या सुळक्यावर कथन करण्यात आले अशी माहिती भूषण पवार यांनी दिली.