कल्याणच्या गिर्यारोहकांनी ७५ मिनिटात सर केला थम्स अप सुळका

By मुरलीधर भवार | Published: January 26, 2024 03:21 PM2024-01-26T15:21:07+5:302024-01-26T15:21:19+5:30

कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची ऐतिहासिक कामगिरी, देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ मिनिटात केला मनमाडचा थम्स अप सुळका सर केला.

Climbers of Kalyan climbed the thumbs up cone in 75 minutes | कल्याणच्या गिर्यारोहकांनी ७५ मिनिटात सर केला थम्स अप सुळका

कल्याणच्या गिर्यारोहकांनी ७५ मिनिटात सर केला थम्स अप सुळका

कल्याण: कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर संघाची ऐतिहासिक कामगिरी, देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ मिनिटात केला मनमाडचा थम्स अप सुळका सर केला. कल्याण येथील सुप्रसिद्ध गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक एडवेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजे च हडबीची शेंडी अवघ्या ७५ मिनिटात सर करत देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त करण्यात आला.सोबत च देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.थम्स अप सुळका याची एकूण उंची १८० फूट अशी आहे. मनमाड येथील कातरवाडी पासून सुळक्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे एक तासाचा ट्रेक करावा लागतो.सदर सुळक्याची चढाई अति अवघड श्रेणीत मोडत असल्याने सुरक्षिततेचे विशेष काळजी घ्यावी लागते.

सुळक्याचा भूतकाळ पाहता मागील वर्षी तांत्रिक चुकीमुळे दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , त्यामुळे सदर सुळक्यावर त्यापासून कोणीही चढाई केली नव्हती. पण देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याणच्या सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संघाने ७५ मिनिटात या सुळक्या वर यशस्वी चढाई पूर्ण करत देशाप्रती अनोख्या पद्धतीने अभिवादन व्यक्त करण्यात आले. सदर सुळका हा अति कठीण श्रेणीमध्ये मोडत असल्याने या सुळक्यावर आधुनिक गिर्यारोहणाचे साहित्य वापरून सदर चढाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. सदर मोहिमेत सह्याद्री रॉक एडवेंचर्स या संस्थेचे दर्शन देशमुख, पवन घुगे, भूषण पवार ,संजय करे ,राहुल घुगे उर्फ बारक्या व सुप्रसिद्ध युट्युबर प्रशील अंबादे हे सामील होते.

Web Title: Climbers of Kalyan climbed the thumbs up cone in 75 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण