वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाचा गैरवापर करून निधी संकलन; रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By अनिकेत घमंडी | Published: October 17, 2022 12:40 PM2022-10-17T12:40:04+5:302022-10-17T12:40:54+5:30
दत्तनगर परिसरात अशा प्रकारे रोख निधी जमा केला गेला असल्याचे आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.
डोंबिवली: वनवासी क्षेत्रात ७० वर्षे सेवाकार्य करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाचा गैरवापर करून निधी संकलन केल्याची घटना गेल्या आठवड्यात डोंबिवलीत उघडकीस आली आहे. दत्तनगर परिसरात अशा प्रकारे रोख निधी जमा केला गेला असल्याचे आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.
आश्चर्याची बाब म्हणजे त्या निधीची बनावट पावतीही देण्यात येत होती. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर यात एक युवती सामील असल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात आली. याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार नोंदवली आहे असे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांतसचिव महेश देशपांडे यांनी सांगितले. त्याचबरोबर नागरिकांना असे आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोणतेही निधिसंकलन व.क. आश्रमातर्फे केले जात नाही, नागरिकांनी सावधान व्हावे तसेच अशा प्रकारे कोणतेही रोख निधी संकलन करणारी व्यक्ती आढळून आल्यास याबाबत कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन देशपांडे यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"