केडीएमसीत अधिकाऱ्यांचे सामूहिक काम बंद आंदोलन; सशस्त्र पोलिस बंदोबस्ताची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 02:17 PM2021-09-01T14:17:32+5:302021-09-01T14:17:59+5:30
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगूळ आदींनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
कल्याण-ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांना केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांनी आज सामूहिक काम बंद आंदोलन केले. अधिका:यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी केली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी पल्लवी भागवत, दीपक सावंत, घनश्याम नवांगूळ आदींनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यांना यासंदर्भातील एक निवेदन दिले. अतिरिक्त आयुक्त पवार यांनी सांगितले की, महापालिका अधिका:यांवर असे हल्ले पुन्हा होऊ नयेत. त्याची खरी कारणे काय आहेत. त्यामागे कोण लोक आहेत. या सगळ्य़ांचा विचारविमर्श करण्यासाठी अधिकारी एक बैठक घेणार आहेत. सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बेकायदा आणि कारवाई पथकासाठी एक पोलिस अधिकारी आणि 49 पोलिस देण्यात आले आहेत. जे अधिकारी फिल्डवर असतात. तसेच कारवाईच्या ठिकाणी जातात. त्यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. महापालिका 49 पोलिस आणि पोलिस अधिका:याच्या बदल्यास पोलिस खात्याकडे पैसै भरते. सशस्त्र पोलिस बंदोबस्ताच्या बदल्यातही पैस भरण्यात यावेत. या मागणीवर आयुक्तांनी सकारत्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. सशस्त्र पोलिस बंदोबस्ताचा प्रस्ताव तातडीने पोलिस खात्याकडे पाठविला जाईल.
दरम्यान मुन्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी कल्पीता पिंगळे हल्ला प्रकरणाचा तीव्र व्यक्त केला आहे. बेकायदा फेरीवाल्यांची गुंड प्रवृत्ती मोडीत काढण्यात यावी. या गटना होऊ नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन बेकायदा गुंड प्रवृत्तीचे फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील एक निवेदनही त्यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनास दिले आहे.