आ. गणपत गायकवाड केवळ फळांवर; कोठडीत मिळणारे जेवण नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 09:11 AM2024-02-09T09:11:42+5:302024-02-09T09:12:30+5:30

मुलाचे नाव गोवण्यात राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यामुळेच गायकवाड हे पोलिसांकडून दिले जाणारे जेवण नाकारत असल्याचेही बाेलले जात आहे. 

come Ganpat Gaikwad only on fruits; Denied food in custody | आ. गणपत गायकवाड केवळ फळांवर; कोठडीत मिळणारे जेवण नाकारले

आ. गणपत गायकवाड केवळ फळांवर; कोठडीत मिळणारे जेवण नाकारले

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गोळीबार प्रकरणात पोलिस कोठडीत असलेले आमदार गणपत गायकवाड हे जेवण घेत नाहीत. पोलिसांच्या जेवणावर त्यांना विश्वास नसल्यामुळे ते केवळ फळांचे सेवन करत आहेत, अशी माहिती समाेर आली आहे. 

द्वारली येथील जमिनीच्या वादातून हिललाइन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये आमदार गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गायकवाड सध्या पोलिस कोठडीत आहेत.  गायकवाड यांनी पोलिसांकडून दिले जाणारे जेवण नाकारले आहे. या जेवणावर त्यांना विश्वास नाही. ते केवळ फळांचे सेवन करत आहेत. आमदार गायकवाड यांनी गोळीबाराची कबुली दिली असली, तरी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचा मुलगा वैभव  गायकवाड यालादेखील आरोपी करण्यात आले आहे. मुलाला या प्रकरणात पोलिसांनी नाहक गोवले आहे. मुलाचे नाव गोवण्यात राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यामुळेच गायकवाड हे पोलिसांकडून दिले जाणारे जेवण नाकारत असल्याचेही बाेलले जात आहे. 

Web Title: come Ganpat Gaikwad only on fruits; Denied food in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.