आयुक्त भाऊसाहेब दांगडे अधिकाऱ्यांना दिले फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश
By अनिकेत घमंडी | Published: November 3, 2023 06:24 PM2023-11-03T18:24:39+5:302023-11-03T18:24:47+5:30
आमदार राजू पाटील यांनी भेट देऊन व्यक्त केली नाराजी
डोंबिवली: फेरीवाल्यांवरील कारवाई संदर्भात महापालिका प्रशासनाने तूर्तास कडक भूमिका घेतली आहे. कल्याण, डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई बाबत अधिकारी टाळाटाळ करतात हे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी मान्य करत आत्ता या संदर्भात शुक्रवारी उपायुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर ज्या फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहे. त्यांच्या विरोधात पोलिस आणि महापालिका मिळून संयुक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
गुरुवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांचा मुद्दा लावून धरला होता, पाटील यांनी आयुक्तांनी सूचना केली होती की, फेरीवाल्यांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे. त्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आमच्या पद्धतीने कारवाई करु असा इशारा दिला होता. त्यानंतर आयुक्त दांगडे यांनी माध्यमांना सांगितले की, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व या भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. कल्याण पश्चिमेत अधिकाऱ्याना सुचना देण्यात आल्या आहे.
डाेंबिवली फ आणि ग या दोन प्रभागात येतात. या दोन अधिकाऱ्यात हद्दीचा वाद असतो. आत्ता संबंधित उपायुक्त आणि प्रभाग अधिकाऱ्यांना समन्वय साधून कारवाईचे आदेश दिले आहे. काही फेरीवाले कर्मचारी अधिकारी यांच्यावर हात उचलतात. अशा फेरीवाल्यांच्या विरोधात पोलिस आणि केडीएमसी संयुक्त कारवाई करणार आहे. "त्यानूसार कारवाई सुरू असून नागरिकांनी आयुक्तांच्या या भूमिकेचे समाधान व्यक्त केले आहे.