कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी

By मुरलीधर भवार | Published: September 6, 2024 08:55 PM2024-09-06T20:55:26+5:302024-09-06T20:56:28+5:30

यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख संजय जाधव उपस्थित होते.

commissioner inspected durgadi ganesh ghat of kalyan | कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी

कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटाची आयुक्तांनी केली पाहणी

मुरलीधर भवार-कल्याण: दुर्गाडी गणेश घाट कल्याणमधील सर्वात मोठे नैसर्गिंक विसर्जन स्थळ आहे. या स्थळाची पाहणी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी आज केली. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख संजय जाधव उपस्थित होते.

या ठिकाणी असलेल्या दुर्गामाता चौकातून दुर्गाडी गणेश घाटाकडे जाण्यासाठी यापूर्वी दोन रस्ते होते. यातील एक रस्ता जाण्यासाठी व दुसरा रस्ता बाहेर येण्यासाठी वापरला जात होता. परंतू यातील एक मार्ग चालू वर्षी या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या नेव्हल म्युझीयममुळे कायमस्वरुपी बंद झाला होता. त्यामुळे विसर्जनासाठी येणा-या वाहनांना पर्यायी मार्गाची मागणी पोलीस विभाग तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. या ठिकाणी रिंग रोडवर असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपापासून दुर्गाडी गणेश घाटापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ठिकाणी वाहत असलेल्या नाल्यावर ६ फुट व्यासाचे ४ पाईप टाकुण पूल बनविला आहे. त्यासाठी महापालिका निधीतून २ कोटी रुपये खर्च करण्यास आयुक्तांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एक महिन्याच्या डे नाईक काम सुरु ठेवून काम पूर्ण केले आहे. या मार्गाने वाहने बाहेर पडून ट्रक टर्मिनल्स जागेत असलेल्या रस्त्याच्या मार्गे मुख्य रस्त्याला नेण्यात येतील. यामुळे दरवर्षी दुर्गामाता चौकात विसर्जनाच्या दिवशी होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Web Title: commissioner inspected durgadi ganesh ghat of kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.