भाजपच्या माजी नगरसेवकाची अशीही 'दया', शिवसेना खासदाराचा झळकवला बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:55 PM2022-02-03T13:55:44+5:302022-02-03T14:00:16+5:30

भाजपच्या माजी नगरसेवकाने दिल्या शिवसेना खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, शुभेच्छांचा हटके बॅनर ठरतोय लक्षवेधी

Compassion of former BJP corporator, flashy banner of Shiv Sena MP | भाजपच्या माजी नगरसेवकाची अशीही 'दया', शिवसेना खासदाराचा झळकवला बॅनर

भाजपच्या माजी नगरसेवकाची अशीही 'दया', शिवसेना खासदाराचा झळकवला बॅनर

googlenewsNext

कल्याण - कल्याणचेशिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभच्छा देण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी भला मोठा बॅनर लावला आहे. त्यांचा हा बॅनर लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरला. काम करणारा खासदार हा चांगला माणूस आहे, अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. या शुभेच्छा कसला राजकीय संकेत देतात हे सांगण्याची गरज नाही, अशीच चर्चा कल्याणच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना नुकचीच जाहीर झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे-भाजप यांच्याकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि टिका केली जात आहे. निवडणुकीच्या आधीच भाजपमधील तीन नगरसेवक भाजपला रामराम करुन यापूर्वीच शिवसेनेत गेले आहेत. राज्यात शिवसेना भाजपचे काही एक पटत नाही. एकमेकांना कोंडीत पडकण्याचा एकही मुद्दा हे दोन्ही पक्ष सोडत नाहीत. मात्र, भाजप माजी नगरसेवक गायकवाड यांनी खासदार शिंदे यांना शुभेच्छा देणारा फलक लावला आहे. त्यावर खासदारांनी केलेल्या विकास कामांचे फोटोही लावले आहेत.

याविषयी गायकवाड यांचे म्हणणे आहे की, खासदार श्रीकांत शिंदे चांगले व्यक्तिमत्व आहे. काम करणारा माणूस आहे. रात्री बेरात्री त्यांना कामासाठी उभे राहताना पाहिले आहे. मी हा बॅनर भाजपचा म्हणून लावलेला नाही. त्यावर भाजपचा उल्लेख नाही. मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही. केवळ शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, राजकारण आणि वैयक्तीक संबंध वेगळी गोष्ट आहे. एखाद्याचा बॅनर लावला त्यात राजकीय भाषा करु नये. यासंदर्भात मी माहिती घेतो, त्यानंतर बोलतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

Web Title: Compassion of former BJP corporator, flashy banner of Shiv Sena MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.