पुणे बडोदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या; शिवसेना आमदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:03 PM2021-08-07T19:03:32+5:302021-08-07T19:03:52+5:30
कल्याण तालुक्यातील बल्याणी येथून पुणे बडोदा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात बल्याणीतील नागरीकांच्या जमीनी बाधित होत आहे.
कल्याण तालुक्यातील बल्याणी येथून पुणे बडोदा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात बल्याणीतील नागरीकांच्या जमीनी बाधित होत आहे. या बाधितांना सरकारकडून योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर यांच्याकडे केली आहे.
हा प्रकल्प मोठा आहे. या प्रकल्पात अनेकांच्या जमिनी बाधित होत आहे. सरकारने बाधिताना मोबदला देण्याचे काम सुरु केले आहे. मात्र ज्या जमिनी बाधित झाल्या आहे. त्या जमीनी जमीन मालकांनी काही लोकांना चाळी बांधण्यासाठी दिल्या होत्या. त्यावर चाळी आहे. चाळीत घर घेणारे लोक गोरगरीब आहेत. त्यांनी पदरमोड करुन घरे घेतली आहे. मोबदला दिला जात असताना तो जमीन मालकास दिला जात आहे. त्याजागेवर जाळीत राहणा:याना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. त्यांचाही विचार मोबदला देताना केला जावा. कारण त्या चाळीत राहणारे सामान्य लोक उद्धवस्त होणार असल्याच्या मुद्याकडे आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे. ही समस्या रिंग रोड प्रकल्पाच्या बाबतीत उद्भवली होती. त्याठिकाणी टीडीआरचा लाभ देताना जमीन मालक आणि त्या जागेवर राहणा:यांना नागरीकांचाही विचार केला जाव अशी मागणी केडीएमसी प्रशासनाकडे केली होती. तोच विचार या बाबतीत केला जावा. शिवसेनेचे माजी स्थानिक नगरसेवक मयूर पाटील यांनीही देखील हाच मुद्दा उचलून धरला आहे. भोईर यांच्या मागणी पत्रचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे काही खाजगी जमीन मालकाना मोबदला देण्यात आला आहे. मोबदला घेतलेल्या मोकळया जातेत पुन्हा शेड उभारून पीडब्लूडी विभागाचे अधिकारी काही मंडळींना हाताशी धरुन पुन्हा सव्रे करीत आहे. त्याना पुन्हा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याची बाब समोर आली आहे. याकडेही आमदार भोईर यांनी लक्ष वेधले आहे. ही बाब गंबीर असल्याने त्याची शहानिशा करुन एकही प्रकल्पबाधित मोबदल्यापासून वंचित राहणार नाही याचा करावा अशी मागणी केली आहे.