कल्याणमध्ये पतीच्या विरोधात पत्नीची तक्रार
By मुरलीधर भवार | Published: January 30, 2024 05:38 PM2024-01-30T17:38:43+5:302024-01-30T17:39:12+5:30
पोलिसांनी महिलेची फसवणूक करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण- नपुंसक असल्याचे माहित असताना देखील फसवणूक करत लग्न केले. त्यानंतर शरीर सुखापासून वंचित ठेवल्याच्या आरोपाची तक्रार एका विवाहितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेची फसवणूक करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेलं तक्रार नंतर पोलीस देखील चक्रावून गेले. या महिलेचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती कल्याणजवळ असलेल्या शहाड परिसरात आपल्या पतीसोबत राहत होती.
पती तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवत होता. महिलेने पतीला काहीतरी औषध खाताना पाहिले. तेव्हा तिला समजले की पती नपुंसक आहे. तिच्या पतीवर उपचार सुरू होते. हे समजताच महिलेला धक्का बसला. तिने थेट खडकपाडा पोलीस ठाणे गाठले. नपुंसक असल्याचे माहीत असताना आपली फसवणूक करत त्याने आपल्याशी लग्न केले. शारीरिक सुखापासून वंचित ठेवल्याची तक्रार महिलेने नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.