अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करा!
By मुरलीधर भवार | Published: February 22, 2023 05:38 PM2023-02-22T17:38:55+5:302023-02-22T17:40:06+5:30
केडीएमसी आयुक्तांची सूचना, केली याेजनेच्या कामाची पाहणी
मुरलीधर भवार-कल्याण: केंद्र सरकारच्या अमृत याेजनेतून २७ गावांकरीता पाणी पुरवठा याेजना राबविण्याचे काम सुरु आहे. हे काम डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना कल्याण डाेंबिवली महापालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यानी संबंधित अधिकारी वर्ग आणि ठेकेदाराला दिल्या आहे. आयुक्त दांगडे यांनी आज अमृत पाणी पुरवठा याेजनेच्या कामाची पाहणी केली.
२७ गावे महापालिका हद्दीत २०१५ साली समाविष्ट करण्यात आली. या गावांना यापूर्वीपासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा केला जात हाेता. या गावांमध्ये पाणी वितरण याेजना नव्हती. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यावर केंद्राच्या अमृत याेजने अंतर्गत २७ गावांकरीता पाणी पुरवठा राबविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाला गती देण्यासाठी आयुक्तांनी आज याेजनेचे काम सुरु असलेल्या गाेळवली, दावडी, काेळे, काटई, संदप, सागाव याठिकाणी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या ठिकाणी जलकुंभ उभारले जात आहे. त्याच्या टॅपिंगकरीता एकहजार मिलीमिटर व्यासाच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. याठीकाणी पाहणी केली. यावेळी प्रकल्प ठेकेदार, सल्लागार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित हाेते. यावेळी आयुक्तांनी ठेकेदाराला बजावले की, या याेजने अंतर्गत सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करा. टॅपिंग एकच्या नळ जोडणीचा फायदा १७ गावांना होणार आहे. ती पुढील एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण याेजनेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण झाले पाहिजे. त्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना ठेकेदाराकडून कामाच्या प्रगतीचा बारचार्ट घेऊन त्याप्रमाणे दर दहा दिवसांनी आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येईल आणि कामाची प्रगती किती झाली याची पाहणी करण्यात येईल अशा असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
ही याेजना कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेल्या डेडलाईनुसार पूर्णत्वास येईल यासाठी सर्व विभागांनी याेग्य पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.