बिर्ला महाविद्यालयमध्ये उर्जा उत्सवाचा समारोप
By सचिन सागरे | Published: February 12, 2024 04:24 PM2024-02-12T16:24:43+5:302024-02-12T16:25:40+5:30
ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
कल्याण : बिर्ला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे ‘पाच दिवसीय ऊर्जा उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ अभियानाला चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने आयोजित या ऊर्जा महोत्सवात सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये चारशे विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, फुटबॉल, रग्बी या गटातील खेळांसह धावणे, शॉटपुट आणि बुद्धिबळ अशा एकूण चौदा खेळांचा समावेश होता. पाच दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन करताना महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग बनविण्याबाबत सांगितले. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी देशाच्या जडणघडणीसाठी युवकांनी सुदृढ असण्याची गरज असून त्यात खेळाचा विशेष वाटा आहे. नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. हरीश दुबे यांनीही खेळाला प्रोत्साहन देण्याबाबत सांगितले. या महोत्सवाचे आयोजक प्रा. अनिल तिवारी यांनी सर्व पाहुणे आणि सहभागींचे आभार मानले.
वाय. डी. बागराव, डॉ. दत्ता क्षीरसागर, रेवती हंसवाडकर, डॉ. दिनेश वानुले, डॉ. नारायण तोटेवाड, सूरज अग्रवाल, डॉ. निश्मिता राणा, डॉ. अभिजीत रावल, प्रा. अरनॉल्ड जयथन्ना, वैभव पवार यांच्यासह अन्य व्यक्तींच्या विशेष भूमिका होत्या.