"सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण...", मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन

By प्रशांत माने | Published: December 16, 2022 10:07 PM2022-12-16T22:07:49+5:302022-12-16T22:09:47+5:30

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बंद मागे घ्यावा, लोकांना वेठीस धरु नका असे आवाहन शिंदे गटाला केले आहे.

"Condemnation of Sushma Andhare's statement, but...", MNS MLA Raju Patil appeals to Shinde group | "सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण...", मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन

"सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण...", मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन

Next

डोंबिवलीः सुषमा अंधारे यांनी साधू संताविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेत उद्या शनिवारी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बंद मागे घ्यावा, लोकांना वेठीस धरु नका असे आवाहन शिंदे गटाला केले आहे.

सुषमा अंधारे यांनी साधू संतांविषयी जे वक्तव्य केले. ते निषेधार्ह आहे. पक्ष म्हणून आम्ही देखील त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. इथे असे वक्तव्य कोणी खपवून घेणार नाही. वेगवेगळ्या प्रकारे निषेध केला जात आहे. कोणी रस्त्यावर उतरुन तर कोणी किर्तनातून निषेध करीत आहेत. त्याचे आम्ही देखील समर्थन करीत आहोत. परंतू बंद करुन लोकांना वेठीस धरणे हे आम्हाला पटत नाही. 

शिंदे गटानेही याचा विचार करावा. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतही अवमानकारक गोष्ट झाली होती त्यावेळी देखील शिंदे गटाने असाच पुढाकार घ्यायला पाहिजे होता. अशा गोष्टीत राजकारण आणू नका. जे काही करायचे आहे ते प्रामाणिकपणे करा. त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी जी बंदची हाक दिली आहे. ती त्यांनी मागे घ्यावी असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: "Condemnation of Sushma Andhare's statement, but...", MNS MLA Raju Patil appeals to Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.