उल्हासनगरातील डम्पिंग हटवासाठी काँग्रेसचे उपोषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 07:18 PM2024-07-10T19:18:19+5:302024-07-10T19:18:32+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे.

Congress hunger strike to stop dumping in Ulhasnagar; Citizens' health is at risk | उल्हासनगरातील डम्पिंग हटवासाठी काँग्रेसचे उपोषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगरातील डम्पिंग हटवासाठी काँग्रेसचे उपोषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उल्हासनगर : खडी खदान डम्पिंग ग्राऊंडमुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने, डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाने नेताजी चौकात बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले. महापालिकेकडून ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी दिला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला उन्हाळा व हिवाळ्यात लागणाऱ्या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य असते. तर पावसाळ्यात परिसरात डम्पिंगची दुर्गंधी पसरते. याप्रकाराने डम्पिंग परिसरातील शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना खाज, त्वचा रोग, दमा, टीबी आदी रोगाची लागण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. डम्पिंग हटविण्याची मागणी स्थानिक नागरिक, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे लावून धरली असून त्यासाठी रस्ता रोखो, उपोषण, धरणे आंदोलन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी केली. आतातर डम्पिंगची काय स्थिती आहे, ते कुठे व केंव्हा हटविणार याबाबत महापालिका प्रशासन काहीएक बोलत नसल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला.

 शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी डम्पिंग हटविण्यासाठीं काँग्रेस पक्षाकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याबाबत काहीएक निर्णय महापालिका घेत नसल्याने, अखेर रोहित साळवे यांनी नेताजी चौकात सहकाऱ्यांसह बुधवारी आमरण उपोषणाचा सुरू केले. डम्पिंग हटविण्याची प्रक्रिया सुरू करणे, ज्याठिकाणी डम्पिंग हटविले जाणार. तेथिल परिस्थिती काय? पावसाळ्यात डम्पिंग मधून प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर काही उपाययोजना केली का? असा प्रश्न साळवे यांनी यावेळी केला. तसेच प्रसिद्ध शिवमंदिर, सिंधी समाजाचे चालिया मंदिर डम्पिंग ग्राऊंड पासून अवघे १ की.मी. परिसरात येत असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Congress hunger strike to stop dumping in Ulhasnagar; Citizens' health is at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.