संविधान दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:18 PM2020-11-26T13:18:56+5:302020-11-26T13:19:42+5:30

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली.

Constitution Day celebrated with enthusiasm | संविधान दिन उत्साहात साजरा

संविधान दिन उत्साहात साजरा

googlenewsNext

संविधान दिन उत्साहात साजरा;

कल्याण : विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे., म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे, असे प्रतिपादन रा.स्व.संघ बौद्धिक प्रमुख योगेश कुलकर्णी यांनी संविधान दिनी सार्वजनिक वाचनालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या 'भारतीय संविधान दिवस' समारोहात काढले. 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली. त्यानंतर प्रभाकर ठाकूर यांनी भारतीय संविधानाच्या मुळ प्रतींची माहिती असलेला लेख वाचून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला, सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त  अरुण देशपांडे, सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस आशा जोशी, कवियत्री मंगला कांगणे यांची उपस्थिती होती.

Web Title: Constitution Day celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.