भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन

By अनिकेत घमंडी | Published: January 25, 2024 06:31 PM2024-01-25T18:31:03+5:302024-01-25T18:31:18+5:30

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कॉलेजांमध्ये नवमतदार संमेलनाचे थेट प्रक्षेपण

Contribute to making India a developed nation; Prime Minister Modi's appeal to new voters | भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन

भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींचे नवमतदारांना आवाहन

कल्याण :
आगामी 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्यासाठी संपूर्ण देश काम करत असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी युवा मतदारांचे तुमचे मत महत्त्वपूर्ण ठरेल अशा शब्दांत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नव मतदारांना आवाहन केले. आज असलेल्या राष्ट्रीय नवमतदार दिनानिमित्त मोदी यांनी देशभरातील ५० लाख नवमतदारांशी नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधला. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने टिटवाळा, बल्याणी येथील दुबे कॉलेज आणि कल्याणातील ॲचिवर्स कॉलेजमध्ये या ‘नमो नवमतदाता संमेलन’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये या दोन्ही महाविद्यालयातील अनेक नवमतदार युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 

उद्या भारत देश आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. येणारी पुढील 25 वर्ष ही तुमच्यासोबत देशासाठीही अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. तुमचे एक मत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल, तुमचे एक मत आणि देशाच्या विकासाची दिशा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले.

यावेळी अचिवर्स कॉलेजचे डॉ.महेश भिवंडीकर सर, दुबे कॉलेजचे प्रमूख राहुलजी दुबे, भाजपा मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप रतन पाटील, जिल्हा सचिव रमेश कोनकर, मोहेने टिटवाळा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील, युवा मोर्चा कल्याण मंडल अध्यक्ष सौरभ गणत्रा, सरचिटणीस किरण चौधरी, मंडल सरचिटणीस प्रमोद घरत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शैलेंद्र देशपांडे, युवा मोर्चा वार्ड क्र.१० अध्यक्ष भूषण बापट, वॉर्ड क्र.११ अध्यक्ष हेमंत गायकवाड, युवा मोर्चा वार्ड क्र.८ अध्यक्ष स्वप्नील पठारे आदी. पदाधिकारी विद्यार्थी मित्र मोठया संखेने उपस्थित होते.

Web Title: Contribute to making India a developed nation; Prime Minister Modi's appeal to new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.