कोरोना निर्बंध; कल्याणमध्ये सात नंतरही काही दुकाने उघडीच, पोलिसांना पाहून दुकानदारांची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:29 AM2021-03-12T00:29:22+5:302021-03-12T00:47:08+5:30

महापालिका हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आज या र्निबधाचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली.

Corona restraint; In Kalyan, even after seven, some shops are still open | कोरोना निर्बंध; कल्याणमध्ये सात नंतरही काही दुकाने उघडीच, पोलिसांना पाहून दुकानदारांची तारांबळ

कोरोना निर्बंध; कल्याणमध्ये सात नंतरही काही दुकाने उघडीच, पोलिसांना पाहून दुकानदारांची तारांबळ

Next


कल्याम- कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका आयुक्तांनी आजपासून कोरोनाचे र्निबध लागू कले आहेत. या पाश्वभूणीवर पोलिसांनी पाहणी केली असता अनेक दुकाने सातनंतरही उघडीच असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांना पाहून अनेक दुकानदारांची चांगली तारांबळ उडाली.

महापालिका हद्दीतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आज या र्निबधाचा पहिला दिवस होता. सायंकाळी पोलिसांची गाडी फिरू लागल्यावर दुकानदारांची एकच धावपळ उडाली. अनेक दुकाने सात वाजून गेले तरी उघडीच असल्याचे दिसून आले. पोलिसांनी गाडी थांबवून दुकाने उघडी असलेल्या दुकानदारांना चांगलीच तंबी दिली. कोरोनाचे नियम पाळा, पोलिसांना उगाच कारवाई करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन पोलिसांनी यावेळी दुकानदारांना केले. मात्र काही दुकानदारांनी सातच्या आतच दुकानाचे शटर डाऊन केले होते. खाद्य शितपेयाच्या हातगाड्यांना ही सातपर्यंत मुभा असल्याने या गाड्या रस्त्यावर सातच्या आतच बंद झाल्याचे चित्र दिसून आले.



 

Web Title: Corona restraint; In Kalyan, even after seven, some shops are still open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.