'या' तारखांना सकाळच्या सत्रात होणार कोरोना लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 08:37 AM2021-11-04T08:37:21+5:302021-11-04T08:38:10+5:30
Corona vaccination : 7 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहील असं देखील सांगण्यात आलं आहे
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. लसींचा मुबलक साठा उपलब्ध होत असल्यानं आता यासंदर्भातील तक्रारीही अत्यल्प झाल्या आहेत. दरम्यान, 4 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळच्या सत्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे, असं केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून कोविड लसीकरणापासून वंचित राहिलेल्या सर्व नागरिकांनी आपल्या घरा नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाच्या पहिल्या/दुसऱ्या मात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा बंद राहील अस देखील सांगण्यात आलं आहे