Corona vaccine : कोविशिल्डची लस उपलब्ध झाल्याने कल्याण-डोंबिवली लसीकरण आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:04 PM2021-05-05T19:04:05+5:302021-05-05T19:04:40+5:30
Corona vaccination in KDMC : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रतील ४५ वर्षे व त्यावरील नागरीकांचे लसीकरण लस पुरवठा उपलब्ध होत नसल्याने स्थगित करण्यात आले होते. काल रात्री कोवि शिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्याने आजपासून सर्व नियोजीत केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रतील ४५ वर्षे व त्यावरील नागरीकांचे लसीकरण लस पुरवठा उपलब्ध होत नसल्याने स्थगित करण्यात आले होते. काल रात्री कोवि शिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्याने आजपासून सर्व नियोजीत केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रतील ज्या नागरीकांनी कोवि शिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. आत्ता त्यांन कोवि शिल्डचा दुसरा डोस घेण्याची सहा आठवडय़ाचा कालावधीही पूर्ण झाला आहे. त्या नागरीकांकरीता कोवि शिल्डच्या दुस:या डोसकरीता कल्याण पूर्व भागातील प्रबोधनकार ठाकरे शाळेत आणि डोंबिवलीतील क्रिडा संकुलात व्यवस्था करण्यात आली आहे. कोवि शिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.
त्याचबरोबर अद्याप कोव्ॉक्सीन लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. साठा उपलब्ध होताच कोव्ॉक्सीनच्या दुस:या डोसची व्यवस्था करण्यात येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण पूर्वी प्रमाणो कल्याणच्या आर्ट गॅलरी येथे ऑनलाईन स्लॉट बुकींग केल्यावर मोबाईल फोनवर लसीकरणाचे ठिकाण, दिनांक आणि वेळ दर्शविणारा संदेश दाखवून करता येणार आहे. या वयोगटा व्यक्तीरीक्त अन्य वयोगटाचे लसीकरणही आर्ट गॅलरी येथे होणार नाही. लसीचा पहिला व दुसरा डोस प्राप्त होणा:या उर्वरीत लसीकण केंद्राची यादी महापालिकेने जाहिर केली आहे. त्यात १७ ठिकाणे नमूद करण्यात आली आहेत. लसीचा साठा उपलब्ध होईल त्यानुसार ही केंद्रे सुरु ठेवली जातील अन्यथा त्याठिकाणी प्रक्रिया साठय़ा अभावी बंद पडू शकते.