coronavirus: डोंबिवलीत कर्फ्यूच्या रात्रीच लग्न सोहळा, वधू वर पित्याच्या विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:59 PM2021-04-06T14:59:28+5:302021-04-06T15:00:02+5:30
राज्य सरकारने कालपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत कफ्यरू लागू केलेला असताना डोंबिवली कोळेगावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविण्यात आली होती.
कल्याण - कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेने विविध र्निबध लागू केले असले तरी नागरीकांकडून नियमांना हरताळ फासला जात असल्याची आणखीन एक घटना समोर आली आहे. राज्य सरकारने कालपासून रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत कफ्यरू लागू केलेला असताना डोंबिवली कोळेगावात एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नाला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविण्यात आली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वधू वर पिता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या ई प्रभागाचे प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. कोळेगाव येथील सेंटमेरी शाळेच्या मोकळ्य़ा मैदानात नांदिवली येथील नामदेव सखाराम पाटील यांच्या मुलाच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी प्रभाग अधिकारी पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता लग्न कार्याला १५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमविली असल्याचे दिसून आले. त्याठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात आलेला नव्हते. मानपाडा पोलिसांनी नामदेव पाटील यांच्यासह वधू पिता शंकर जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोनच दिवसापूर्वी शिवसेना नगरसेवकाने त्याच्या मुलीच्या लग्न सोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना आत्ता कोळेगावातील लग्न सोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. महापालिका आयुक्तांनी कालच पोलिस प्रशासनासोबत बैठक घेऊन सरकारी र्निबधांची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर लग्न सोहळे आयोजित करणारी मंगल कार्यालये आणि भाजी मंडईवर विशेष लक्ष राहणार असल्याचे सांगितले होते.
लोढा परिसरातील आठ दुकांनाना ठोकले सील
आजपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिल रोजीर्पयत बंद राहणार आहेत. हा आदेश न जुमानता लोढा परिसरातील आठ दुकानदारानी दुकाने उघडली होती. ही बाब लक्षात येताच प्रभाग अधिकारी भरत पवार यांनी त्याठिकणी धाव घेऊन आठ ही दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली आहे.