CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 996 नव्या रूग्णांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 07:23 PM2021-03-28T19:23:19+5:302021-03-28T19:24:08+5:30

CoronaVirus in Kalyan-Dombivali : गेल्या 24 तासात  558 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रूग्णांची मोठया प्रमाणावर भर पडल्याने सद्यस्थितीला  7 हजार 775 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus in Kalyan-Dombivali: Corona virus in Kalyan-Dombivali, adds 996 new patients in a day | CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 996 नव्या रूग्णांची भर

CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 996 नव्या रूग्णांची भर

Next

कल्याण : कल्याणडोंबिवलीत कोरानाचा कहर सुरुच आहे. रविवारी तब्बल 996 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर  4 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

गेल्या 24 तासात  558 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रूग्णांची मोठया प्रमाणावर भर पडल्याने सद्यस्थितीला  7 हजार 775 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा 76 हजार 489 पर्यंत पोहोचला आहे. यातील 67 हजार 467 रूग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. 

याचबरोबर, 1 हजार 247 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत 174 डोंबिवली पूर्वेत 292 कल्याण पश्चिमेत 317, डोंबिवली पश्चिमेला 164, मांडा टिटवाळा 33, मोहना 13 तर पिसवलीत 4 रुग्ण आढळले आहेत
 

Web Title: CoronaVirus in Kalyan-Dombivali: Corona virus in Kalyan-Dombivali, adds 996 new patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.