CoronaVirus in Kalyan-Dombivali : कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, श्रीकांत शिंदेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 04:43 PM2021-03-30T16:43:59+5:302021-03-30T16:44:33+5:30
CoronaVirus in Kalyan-Dombivali : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयावर आयुक्तांसोबत खासदार शिंदे यांनी चर्चा केली.
कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खासदार यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपा आमदार रविंद्र चव्हाण ही उपस्थित होते. (Increase Corona Vaccination Centers and Contact Tracing in Kalyan-Dombivali, demands Shrikant Shinde)
महापालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीस पदाधिकारी विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, विजय साळवी, मनोज चौधरी आदी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येतील या विषयावर आयुक्तांसोबत खासदार शिंदे यांनी चर्चा केली. सध्या महापालिका हद्दीत बेड किती उपलब्ध आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्ण संख्या पाहता आणखीन बेड लागू शकतात. त्याचबरोबर आर्ट गॅलरी आणि पाटीदार भवन सारखे कोविड सेंटर उभारण्याची गरज भासू शकते.
केंद्राकडून राज्याला कोरोना लसीचा साठा कमी मिळत आहे. ही बाब लोकसभा अधिवेशनात खासदारांनी उपस्थित केली होती. पुरेसा लसीचा साठा उपलब्ध होता लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरणाकरीता आणखीन केंद्रे वाढविता येऊ शकतात. लसीचा पुरेसा साठा महाराष्ट्रासह ठाणो जिल्ह्यास उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग वाढविता येणार आहे. या सगळ्य़ा गोष्टी लक्षात घेता आयुक्तांनी महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवावीत. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही वाढविण्यात यावे याकडे लक्ष वेधले आहे.
या बैठकीस उपस्थित असलेले भाजपा आमदार चव्हाण यांनी सांगितले की, कोरोना काळात शिवसेना-भाजपा असा कोणताही विषय नाही. कोराना लसीकरण केंद्रे वाढविण्यात यावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात यावे. त्यासाठी 200 जणांचा कर्मचारी वर्ग लागणार आहे. त्यासाठी तजवीज करुन कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य सोयी सुविधा वाढविण्यात याव्यात, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.