CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:47 PM2021-05-28T15:47:55+5:302021-05-28T15:55:46+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : महिला डॉक्टरच कौतुक करावं तितकं कमीच आहे. कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत. 

CoronaVirus Live Updates Despite suffering from blood disease doctor deepa bagaria doing patient care | CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

Next

जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोनांसंकटाशी दोन हात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी व इतर कोविड योद्धे घरादार विसरून जीव तळहातावर ठेवून अहोरात्र झटत आहेत. मात्र अशा कठीण परिस्थितीत रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील एक महिला डॉक्टर वर्षभर रूग्णांची  सेवा करत आहेत. या महिला डॉक्टरच कौतुक करावं तितकं कमीच आहे. कर्तव्यापुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिला डॉक्टर रुग्णांची सेवा करत आहेत. 

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या डॉ. दीपा बागरे या गेल्या पाच वर्षांपासून केडीएमसीच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत आहेत. सिकल सेल एनेमिया या रक्ताच्या गंभीर आजाराने त्या गेल्या 14 वर्षांपासून त्रस्त आहे. गंभीर आजाराशी सामना करत असताना देखील कोरोनाकाळात कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी वर्षभरापासून कोरोना रुग्णांची सेवा केलीय. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना कोरोनाने गाठले होते मात्र इच्छाशक्ती व योग्य उपचाराच्या जोरावर त्यांनी कोरोना हरवलं व न डगमगता पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या.  आजारासोबतच एकीकडे कुटुंब आणि दुसरीकडे रुग्णसेवा या दोन्ही जबाबदाऱ्या डॉ. दीपा बागरे लीलया सांभाळत आहेत. 


 

Web Title: CoronaVirus Live Updates Despite suffering from blood disease doctor deepa bagaria doing patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.