coronavirus: कल्याणच्या डी-मार्टमधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, पाच दिवसांकरिता डी-मार्ट सिल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:29 PM2021-03-18T17:29:06+5:302021-03-18T17:30:05+5:30
Coronavirus In KDMC : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काल कोरोनाचे नव्याने ५९३ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय हे पाहून महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत काल कोरोनाचे नव्याने ५९३ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतेय हे पाहून महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. या टेस्टींग मोहिमेत कल्याणच्या डी मार्ट मध्ये कोरानाचे सहा कर्मचारी कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आढळून आली आहे. त्यामुळे डी मार्ट पाच दिवसाकरीता सील करण्यात आले आहे. (Six employees of Kalyan's D-Mart corona positive, D-Mart sealed for five days)
महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलाना फेरीवाले, दुकानदार यांच्या कोरोना टेस्ट करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाला होती. तेव्हा महापालिका हद्दीत १ हजार २०० जणांची दररोज कोरोना टेस्ट केली जात होती. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने पुन्हा टेस्टींगचे प्रमाण वाढविले आहे. परवाच्या दिवशी २ हजार ८०० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. कालच्या तारखेत कोरोना टेस्टींगचे प्रमाण ३ हजार ५०० इतके होते. टेस्टींगचे प्रमाण वाढविल्याने काल डी मार्टमधील ११० जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी सहा कर्मचारी कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले. महापालिकेने डी मार्ट पाच दिवसाकरीता सील केले आहे. तसेच अन्य कर्मचा:याना क्वारंटाईन करण्यात आले आहे. डी मार्टमध्ये दररोज हजारो लोक खरेदीसाठी येतात. त्याठिकाणी सोशल डिस्टसींग आणि मास्कचे पालन केले जात नाही. त्यामुळे त्याठिकाणी सहा कर्मचारी पॉझीटीव्ह आढळून आले. प्रत्यक्षात या कर्मचा:यांचा अन्य किती जणांशी संपर्क आला आहे याचा नेमका आकडा महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. त्याला महापालिका अपवाद नाही. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आणू नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. लॉकडाऊनच्या भितीपोटी नागरीकांकडून खरेदीसाठी डी मार्टमध्ये गर्दी केली जात आहे. महापालिकेने ११ मार्चपासून कड र्निबध लागू केले. त्यानंतर काल मिशन बिगेन्स अगेन्सची नोटिसही कालच जारी केली आहे. त्यात काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. दंडात्मक कारवाई, गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही कल्याण डोंबिवलीत काही एक फरक पडत नसल्याची बाब डी मार्टच्या प्रकरणावरुन समोर आली आहे.
यापूर्वीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी डी मार्टवर यापूर्वी कारवाई केली होती. तसेच डी मार्टला १० हजार रुपयांची दंड महापालिका प्रशासनाकडून ठोठावण्यात आला होता. त्यानंतरही डी मार्टमध्ये सुधारणा आढळून आली नाही. पाच दिवसानंतर कोरोना नियमावलीचे पूर्ण पालन करुन त्याला मार्ट खोलता येणार नाही आहे.