कोकणवासीयांच्या मदतीसाठी सरसावले कल्याणकर, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने 7 टन साहित्य रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:40 PM2021-07-29T15:40:33+5:302021-07-29T15:41:18+5:30

Konkan Flood News: कल्याण पूर्वेत देखील नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने मातोश्री गुंजाई फाउंडेशन व कै. मधुकर कचरू म्हात्रे प्रतिष्ठान आणि कल्याण पूर्व शिवसेनेच्यावतीने 7 टन साहित्य कोकणात रवाना करण्यात आलंय.

Corporator Mahesh Gaikwad's initiative to send 7 tons of literature to help the people of Konkan | कोकणवासीयांच्या मदतीसाठी सरसावले कल्याणकर, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने 7 टन साहित्य रवाना 

कोकणवासीयांच्या मदतीसाठी सरसावले कल्याणकर, नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने 7 टन साहित्य रवाना 

googlenewsNext

कल्याण - कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो .. कल्याण डोंबिवलीकर नेहमीच मदतीसाठी पुढे येतात हे अनेकदा  दिसून आलाय. पावसानं कोकणात धुमाकूळ घातला.. जनजीवन विस्कळीत झालं.. लोक रस्त्यावर आलेत.. होत नव्हतं सर्व पुराच्या पाण्यानं वाहून नेलं...या कठीण परिस्थितीत येथील नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत  आहेत. कल्याण पूर्वेत देखील नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने मातोश्री गुंजाई फाउंडेशन व कै. मधुकर कचरू म्हात्रे प्रतिष्ठान आणि कल्याण पूर्व शिवसेनेच्यावतीने 7 टन साहित्य कोकणात रवाना करण्यात आलंय. नागरीकांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. (Corporator Mahesh Gaikwad's initiative to send 7 tons of literature to help the people of Konkan)

कोकणात मोठ्या प्रमाणात पुराने थैमान घातले असून अनेक घरे उद्ध्वस्त केली.पुराच्या पाण्याने नागरिकांच्या घरातील अन्नधान्य आणि इतर साहित्याची नासधूस झाली. कोकणात ज्या प्रमाणे आपण निसर्गाचा आनंद घ्यायला जातो, त्याप्रमाणेच आता कोकणवासीयांच्या मदतीसाठी देखील सर्व नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन नगरसेवक महेश गायकवाड यांनी केलय.अन्नधान्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू आदी 7 टन साहित्य जमा झालय.  हा तृक रत्नागिरी येथे रवाना झाला असून येथील नागरिकांना साहित्याच वाटप करण्यास देखील सूरवात झालीये. 
 

Web Title: Corporator Mahesh Gaikwad's initiative to send 7 tons of literature to help the people of Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.