पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Published: January 8, 2023 08:08 PM2023-01-08T20:08:12+5:302023-01-08T20:08:18+5:30

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

Corruption of transfers in PWD department stopped: Minister Ravindra Chavan | पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

googlenewsNext

कल्याण: पिडब्ल्यू खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार आता पूर्ण थांबला असलयाचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. कल्याणमधील रामभाऊ कापसे व्याख्यानमालेच्या समारोपाच्या भाषणात त्यांनी ही माहिती दिली. अन्न नागरी पुरवठा विभागातील भ्रष्टचार देखील थांबवून पारदर्शकता करण्यासाठी मोठी आव्हानात्मक निर्णय घेण्यात येत असून सामान्य नागरिकाला धान्य मिळेल यासाठी गरीब कल्याण योजना राबवण्यात येत आहे.

कोरोना काळात ही योजना सुरू झाली, आतापर्यंत ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले, सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळायला हवा ही भावना या  शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. दिवाळीच्या याच योजनेतून ७ कोटी नागरिकांना धान्य देण्यात आले. सामान्य माणसाला लागणाऱ्या आवश्यक त्या योजना या सरकारद्वारे करण्यात येत आहेत.

आगामी काळात आर्थिकदृष्ट्या योजना तयार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं हे मोठं आव्हान आहे. सरकारी नोकऱ्या या सामान्य नागरिकांना कशा।मिळणार यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ७५ हजार नोकऱ्या देण्याचे नियोजन करण्यात येत असून पोलीस दल, बँका आदी सर्व ठिकाणी नोकऱ्या।देण्यात येणार आहेत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपलं सरकार आहे, हे सरकार जनसामान्यांचे सरकार आहे हे विचारात घ्यायला हवं, या सरकारने भरपूर वेगळे काम।केले असून विदर्भात अनुशेष भरून काढायला लावला.

कोकणात वेगळ्या पद्धतीने प्राधिकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, एमएमआरडीएच्या माध्यमातून खुंटलेला विकास पूर्ण  मार्गी लावण्यात आला. सबका साथ सबका विकास यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत कार्यरत आहेत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्मयोगी म्हणून कार्यरत आहेत, चला त्यांच्या पाठिशी आपण ऊभे राहूया. 

त्यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमा नरेंद्र पवार, माजी आमदार नरेंद्र पवार, सुभेदार वाडा कट्ट्याचे आनंद कापसे, दीपक।जोशी, आमोद काटदरे, माजी नगरसेवक वरुण पाटील, कोनगावच्या सरपंच रेखा पाटील, पद्माकर कुलकर्णी, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.

शत प्रतिशत भाजप
पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.

Web Title: Corruption of transfers in PWD department stopped: Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण