केडीएमसी हद्दीतील वृक्षांची गणना सुरू
By मुरलीधर भवार | Published: June 13, 2023 06:09 PM2023-06-13T18:09:09+5:302023-06-13T18:09:52+5:30
२००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील वृक्षांची गणना महापालिकेने आजपासून सुरु केली आहे. हे काम वर्षभर सुरु राहणार आहेत. यापूर्वी २००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यानंतर १६ वर्षांनी वृक्षगणना सुरु करण्यात आली आहे.
खाजगी एजन्सी मार्फत वृक्ष गणना करण्यात आहे. पूर्ण टेक्नॉलॉजी वापरत मोबाईल ॲप ,सॉफ्टवेअर, डॅशबोर्ड सुद्धा असणार आहे. शहरातील खाजगी , सरकारी जागेतील , महाविद्यालय,शाळा किंवा कुठल्याही जागेतील झाडे मोजले जाणार आहेत. त्याचा सर्व रेकॉर्ड मेंटेन केला जाणार असून झाडाची स्थिती झाडाचे वय देखील काढले जाणार आहे. तर शहराच्या कानाकोपर्यातील वृक्षाची माहितीसह गणना करणे आवश्यक असल्यामुळे वृक्ष गणना पुढील वर्षभराचा कालावधीत पूर्ण होईल असा दावा उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी केला आहे.
महापालिका हद्दीत कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या कामात दुर्गाडी ते टिटवाळा दरम्यान ३ हजार झाडे बाधीत झाली होती. या बाधित झाडांच्या बदल्यात एमएमआरडीने दिलेल्या निधीतून महापालिकेने आंबिवलीनजीकच्या टेकडीवर वनराई फुलविली. या टेकडीवर विविध प्रकारचे १५ हार ५०० झाडे लावण्यात आली. त्याच टेकडीलगत आणखीन काही भूखंडाची मागणी करुन त्याठिकाणी या वनराईचे एक्स्टेशन करण्याचा प्रकल्प महापालिकेच्या डोक्यात आहे. प्रकल्पात अनेक झाडे तोडण्यात आलेली आहेत. तसेच विविध बिल्डरांकडूनही झाडे तोडली जाता. त्यांच्याकडून एका झाडाच्या बदल्यात झाडे लावून घेतली जातात.
महापालिकेच्या डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात माजी आमदार अशोक मोडक आणि सामाजिक कार्यकर्ते अप्पा बाहेकर यांनी ५ हजार झाले २५ वर्षापूर्वी लावली होती. तर कल्याण शीळ रोड लगत नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीतील सेवेकऱ््यांनी झाडे लावली आहेत. डोंबिवली ठाकूर्ली नजीक असलेल्या रेल्वेच्या जागेतील जवळपास एक हजार झाडे तोडण्यात आली होती. आत्ता उंबार्ली टेकडीवर वनराई आहे. महापालिकेचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांच्या कारकिर्दीत २००७ साली वृक्ष गणना करण्यात आली होती.