Dahi Handi: दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत

By मुरलीधर भवार | Published: August 18, 2022 07:20 PM2022-08-18T19:20:59+5:302022-08-18T19:21:34+5:30

Dahi Handi: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविले जात नाहीत. कुणाल पाटील फाऊडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आडीवली ढोकळी येथे साजरी करण्यात येणार आहे.

Dahi Handi: Dahi Handi Board's unique announcement, financial assistance to KDMC to fill potholes | Dahi Handi: दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत

Dahi Handi: दहीहंडी मंडळाची अनोखी घोषणा, खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीला करणार आर्थिक मदत

googlenewsNext

- मुरलीधर भवार 
कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावर खड्डे पडले असून ते बुजविले जात नाहीत. कुणाल पाटील फाऊडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आडीवली ढोकळी येथे साजरी करण्यात येणार आहे. दहिहंडी उत्सवाच्या पारितोषिकाच्या रक्कमेतून ५० हजार ते एक लाख रुपये महापालिकेस खड्डे बुजविण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे प्रमुख कुणाल पाटील यांनी केली आहे. त्यांची ही घोषणा चर्चेचा विषय आणि लक्षवेधी ठरली आहे. त्यांनी ही घोषणा करुन महापालिकेच्या नाकर्ते पणावर बोट ठेवले आहे.

कोरोना काळात दोन वर्षे दहिहंडी उत्सव साजरा करता आला नाही. कुणाल पाटील फाऊंडेशन कोरोनापूर्वी दरवर्षी दहिहंडी उत्सव साजरा करीत होते. कोरोनामुळे त्याला खंड पडला होता. मात्र कोरोना काळात दहिहंडी उत्सवावर खर्च होणारी रक्कम फाऊंडेसनच्या वतीने गरजू रुग्णांना दिली. तसेच काही रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविल्या होत्या. त्याचबरोबर अतिवृष्टीचा फटका बसलेल्या घरांतील नागरीकांनाही मदतीचा हात दिला होता.

यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी आहे. त्यामुळे दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. फाऊंडेसनच्या वतीने आडीवळी ढोकली येथे दहिहंडी बांधली जाणार आहे. या दहीहंडीच्या ठिकाणी जी गोविंद पथके येऊन सलामी देणार आहे. तसेच अंतिम थर लावू जे मंडळ हंडी फेाडणार आहे. त्यांना विविध रक्कमेची पारितोषिके दिली जाणार आहे. जवळपास दहा लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहे. महापलालिका हद्दीत रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे महापालिकेचे लक्ष नाही. दहिहंडीनंतर गणोशोत्सव आहे. गणोशाचे आगमन तरी चांगल्या रस्त्यातून व्हावे यासाठी दहिहंडी पारितोषिकांच्या रक्कमेतून 50 हजार ते एक लाख रुपये महापालिकेस खडडे बुजविण्यासाठी दिले जाणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Dahi Handi: Dahi Handi Board's unique announcement, financial assistance to KDMC to fill potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.