नाच रे 'बैला' हळदी समारंभात, संचारबंदीतही डिजे लावून पैशांची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:38 PM2021-04-17T17:38:52+5:302021-04-17T17:39:35+5:30
चिंचपाडा येथे राहणारे प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाचा हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन बैलांना नाचविण्यात आले.
कल्याण - कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही मंडळींना आरोग्याचे आणि सामाजिक परिस्थितीचे भान नसल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा गावात एका हळदी सभारंभात चक्क बैल नाचविण्यात आले. बैलावर पैशाची उघळणही करण्यात आली. या ठिकाणी सोशल डिस्टसिंगचे पालन केले गेले नाही. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची गंभीर दखल महापालिका प्रशानाकडून घेण्यात आली. संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आाहे.
चिंचपाडा येथे राहणारे प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाचा हळदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दोन बैलांना नाचविण्यात आले. त्याठिकाणी डिजेही लावण्यात आला होता, या बैलांवर पैशाही उधळण्यात आला. या कार्यक्रमात सोशल डिस्टसींगची पालन करण्यात आले नाही. मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. हा प्रकार कळताच प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कल्याण पूर्व भागात संचारबंदी असताना एका बारमध्ये मद्यपान करीत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी याप्रकरणी २१ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कल्याण पूर्व भागात बाजारही भरला होता. त्यानंतर आज पुन्हा हळदी सभारंभातील बैल नाचविण्याचा प्रकार समोर आला आहे. यापूवी कोरोना काळात डोंबिवलीतील मोठा गाव ठाकूर्ली परिसरातील एका तरुणाने बैलाचा वाढदिवस साजरा केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एका माजी नगरसेवकाच्या मुलीच्या लग्न सोहळ्य़ात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोरोना वाढत असातना अशा प्रकारच्या बेजबाबदारपणाच्या घटना घडत असल्याने कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे भय लोकप्रतिनिधींसह समान्य नागरीकांनाही राहिले नाही असे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे.